‘ज्ञानशक्ती अभियानाच्या (टीप) अंतर्गत वर्ष २०२२ आणि २०२३ या कालावधीत देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यात मी आणि सहसाधक श्री. भास्कर खाडीलकर यांनी ग्रंथांच्या वितरणाची सेवा केली. वर्ष १९७० मध्ये मी देवगड येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. तेव्हापासून आतापर्यंत माझा देवगड तालुक्यातील अनेक शाळांशी संबंध आला. त्यामुळे हे अभियान (टीप) राबवण्यासाठी मला एक प्रकारे आत्मविश्वास होता. त्या संदर्भातील सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.
(टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ग्रंथसंपदा समाजातील अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोचवण्यासाठी राबवलेले अभियान.)
१. देवगड येथील २ शाळांना ग्रंथ देणे
‘देवगड (सिंधुदुर्ग) परिसरात रहाणार्या माजी विद्यार्थ्यांकडून देणग्या गोळा करून, त्यातून शाळेला ग्रंथ भेट देऊ’, अशी मला कल्पना सुचली. त्याप्रमाणे २ दिवस संपर्क केल्यानंतर आम्हाला अनेक जणांनी अर्पण दिले. त्यातून देवगड येथील ‘शेठ मफतलाल गगलभाई माध्यमिक शाळे’साठी ९९ आणि जामसंडे येथील ‘श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक शाळे’साठी २३ ग्रंथ देणगी म्हणून देता आले.
२. शिरगाव येथील माध्यमिक शाळेला ग्रंथ भेट देणे
सहसाधक श्री. भास्कर खाडीलकर यांनी शिरगाव येथील लोकांकडून देणगी गोळा करून शिरगाव येथील माध्यमिक शाळेला ३५ ग्रंथ भेट दिले.
३. गुरुकृपेने आम्हाला एकूण २५ माध्यमिक शाळा, ४ महाविद्यालये, ४ सार्वजनिक वाचनालये, २० प्राथमिक शाळा यांत ६५० ग्रंथ वितरण करता आले.
या अभियानामुळे गुरूंनी अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील व्यक्ती यांना अर्पण करण्याची संधी दिली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तितकी अल्पच आहे.’
– श्री. शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७८ वर्षे), देवगड, सिंधुदुर्ग. (नोव्हेंबर २०२३)