NCERT Removed Brahmins Lesson : ‘पुरोहितांनी शूद्र आणि महिला यांना वेदांचे ज्ञान मिळू दिले नाही’, असा उल्लेख असणारा धडा एन्.सी.ई.आर्.टी.ने हटवला !

माहिती अधिकार कार्येकर्ते विवेक पांडे यांनी या संदर्भात मागितलेला पुरावा  एन्.सी.ई.आर्.टी. सादर करू शकली नाही !

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिकवला जाणारा ब्राह्मण आणि पुरोहित यांच्याविषयीचे भ्रामक लिखाण असणारा धडा काढून टाकण्यात आला आहे. या संदर्भात गेल्या वर्षी माहिती अधिकार कार्येकर्ते विवेक पांडे यांनी याप्रकरणी एन्.सी.ई.आर्.टी.कडे लेखी पुरावे मागितले होते. ‘हिंदु पुरोहित किंवा ब्राह्मण हे महिला आणि शूद्र यांच्याशी भेदभाव करतात’, असा एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात असलेल्या उल्लेखाचा पुरावा देण्याची मागणी पांडे यांनी माहिती अधिकारात केली होती. यावर एन्.सी.ई.आर्.टी.ने उत्तर देतांना म्हटले होते, ‘ब्राह्मण आणि पुरोहित महिला आणि शूद्र यांना वेद शिकवत नसल्याच्या दाव्यासाठी आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत.’ तसेच एन्.सी.ई.आर्.टी.ने हा दिशाभूल करणारा दावा त्यांच्या पुस्तकांमधून काढून टाकण्याचे आश्‍वासनही दिले. त्यानुमार आता वर्ष २०२३-२४ च्या पुस्तकातून हा भाग काढून टाकण्यात आला आहे.

काय म्हटले होते पुस्तकात ?

सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या ‘राज्य, राजा आणि प्राचीन प्रजासत्ताक’ (पृष्ठ क्रमांक ४४-४५) या पाचव्या धड्यात म्हटले होते की, पुरोहितांनी जातीव्यवस्था निर्माण केली आणि ती जन्माने ठरवली जाते. महिलांना शूद्रांच्या गटात ठेवून त्यांना वेदांचा अभ्यास करण्यापासून रोखले जात आहे. एवढेच नाही, तर पुरोहितांनी काही लोकांना अस्पृश्य घोषित केले होते.

संपादकीय भूमिका 

हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !