रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या कार्यशाळेच्या वेळी रत्नागिरी येथील साधिका कु. अनया कात्रे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे

१ अ. आश्रमातून ‘नियोजन कसे असावे ?’ आणि त्यात ‘सातत्य कसे ठेवावे ?’, हे गुण मला शिकायला मिळाले.

१ आ. कै. पू. होनपकाका यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे : कै. पू. होनपकाका यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवले. त्यांचा चेहेरा हसतमुख होता. मला त्यांचे भावपूर्ण दर्शन झाले.

२. अनुभूती

कु. अनया कात्रे

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मममी बोलू शकून मनातील भीती न्यून होणे आणि कार्यशाळेत मनमोकळेपणाने बोलल्यावर मनात उत्साह निर्माण होऊन हलकेपणा जाणवणे : ‘पूर्वी माझ्याकडून स्वतःहून बोलणे होत नव्हते. कुणी सांगितले, तरच मी बोलत होते; पण कार्यशाळेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर मला तेथील चैतन्य ग्रहण करता आले. गुरुदेवांच्याच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मी सर्वांशी बोलू शकले आणि बोलतांना माझ्या मनातील भीती न्यून झाली. कार्यशाळेत मनमोकळेपणाने बोलल्यावर मला उत्साह आणि हलकेपणा जाणवला.

२ आ. आश्रमातील नीटनेटकेपणामुळे पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.

कु. अनया कात्रे, रत्नागिरी (१.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक