विविध शारीरिक त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तात्काळ लाभ होऊन मनाची सकारात्मकता वाढणे

‘मला १५ दिवसांपासून ‘अपचन, झोप न लागणे, पित्त होऊन उलटी होणे आणि भूक न लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते. मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला निरनिराळे नामजपादी उपाय करायला सांगितले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. विविध त्रासांसाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय

श्रीमती भारती पदमन्

अ. पित्ताचा त्रास : ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करणे. मी हा नामजप करायला लागल्यानंतर मला होत असलेला पित्ताचा त्रास ८ ते १० दिवसांतच नाहीसा झाला.

आ. पित्ताशयातील खडे : ‘श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्रीराम जय राम जय जय राम । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करणे.

इ. झोप न लागणे : रात्री ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप तळहात डोळ्यांसमोर धरून अर्धा घंटा करणे. मी हा नामजप करायला लागल्यापासून २-३ दिवसांतच मला होणारा त्रास दूर झाला.

ई. भूक न लागणे : ‘महाशून्य’ हा नामजप एक तळहात डाव्या कानाच्या वर आणि दुसरा तळहात नाभीवर असा न्यास करणे. त्यानंतर अवघ्या २ दिवसांतच मला भूक लागू लागली.

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्हाला ऋषितुल्य सद्गुरु गाडगीळकाका लाभले’, त्याबद्दल श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती भारती पदमन्, हडपसर, पुणे. (६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक