सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने
१. लक्ष्य (ध्येय) : ‘श्री गुरूंच्या शिकवणीनुसार स्वतःला पूर्णत: गुरुचरणी (परमात्मास्वरूपात) समर्पित करणे, हे उत्तम शिष्याचे ध्येय असते.
२. लक्षण : गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)