पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती !

पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख

बारामती (पुणे) – पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या स्थानांतराचे आदेश पारित केले आहेत. नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारतील.

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार, तर महासंचालकपदी रितेश कुमार  !

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे पोलीस महासंचालक पदावर स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर रितेश कुमार यांच्याकडे होमगार्ड महासमादेशकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.