४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद ! : शहापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या पदार्थाचे नमुने पडताळणीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी दायित्वशून्यता आणि निष्काळजीपणा करणारे आश्रमशाळेतील अधीक्षक एन्.डी. अंभोरे, प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सारिका गायकवाड, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवनराव देशमुख आणि बाहेरील जेवण पुरवणारे वाशिंद येथील पंढरी चव्हाण या ४ जणांच्या विरोधात वाशिंद पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.