मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत वंचित सहभागी

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली. जागावाटपाविषयी ही बैठक होती. दुसर्‍या बैठकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. मविआचा ४० जागांसंदर्भात निर्णय झाला असून अजून ८ जागांच्या संदर्भात निर्णय बाकी आहे. वंचितने ठाकरे गटासमवेत गेल्या वर्षी आघाडी केली होती. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांत मविआला वंचितच्या प्रवेशाचा लाभ होऊ शकतो.