‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।

माझे यजमान श्री. नितीन सहकारी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी असा घेतला कृष्णाने आढावा…

श्री. नितीन सहकारी

गत‍वर्षापासून आजमिती किती वाढली कृष्णभक्ती।
किती स्वभावदोष लुप्त झाले अन् किती झाली शरणागत स्थिती।। १।।

किती वेळा बोललात तुम्ही कृष्णाशी आणि तो तुमच्याशी।
किती नष्ट झाल्या अपेक्षा अन् जीव झाला मोरपिशी (आनंदी)।। २।।

किती लाभला संतसहवास, किती साठांचा (टीप १) सहवास।
कृतज्ञता झाली का व्यक्त, कृष्ण आहेच हो आसपास।। ३।।

किती वेळा प्रयत्न झाला जिंकण्या गुरूंचे मन।
स्वतःला विसरलात अन् अर्पण झाले का तन, मन अन् धन।। ४।।

घाबरू नका, वाचून ही लांबलचक प्रश्नावली।
कृष्णच पुसत आहे, आपल्या भक्ताची खुशाली।। ५।।

कृष्णालाच आहे काळजी, तोच आहे त्राता।
तुम्हीच आता व्हायचे आहे, तुमचे भाग्यविधाता।। ६।।

सौ. श्रुति सहकारी

विचारण्याची कृष्णाची ही तर्‍हा असे न्यारी।
दिसले नाही; म्हणून तो शब्दच बोलके करी (टीप २)।। ७।।

कळले का काही, पडला का डोक्यात प्रकाश।
चैतन्याने आमच्यासाठी त्याने व्यापले धरती-आकाश।। ८।।

सांगू नका कुणाला, गुपित तुमच्यापाशीच ठेवा।
चराचरात तोच आहे, केवळ दृष्टी स्वच्छ ठेवा।। ९।।

‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।। १०।।

कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।। ११।।

टीप १ – ६० टक्के किंवा त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांचा सहवास
टीप २ – कृष्ण प्रत्यक्ष दिसत नाही.’

– सौ. श्रुती नितीन सहकारी, फोंडा, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक