एकदा एक साधिका फळ्यावर चूक लिहून येत होती. तेव्हा तिने मला विचारले, ‘‘अपेक्षा’ हा शब्द योग्य कि ‘आपेक्षा ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘अपेक्षा !’’ तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘मी फळ्यावर ‘आपेक्षा’, असा शब्द लिहिला आहे. तू फळ्याकडे जातच आहेस, तर ‘माझा’ काना पुसून टाक.’’ (त्या वेळी तिला म्हणायचे होते की, मी लिहिलेल्या ‘आपेक्षा’ या शब्दातील ‘आ’ या अक्षराचा काना पूस.)’
– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०२३)