श्रीरामभक्तांना अयोध्या येथे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी
कोल्हापूर – श्रीरामभक्तांना अयोध्या येथे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी रेल्वेने उपलब्ध करून दिली असून १२ फेब्रुवारीला ‘कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर’ ही विशेष गाडी कोल्हापूर येथून निघणार आहे. ही गाडी १३ फेब्रुवारीला रात्री ९.५० वाजता निघून ती १५ फेब्रुवारीला अयोध्या येथे दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी पोचेल. ही गाडी १६ फेब्रुवारीला रात्री ९.२० वाजता सुटेल आणि १८ फेब्रुवारीला दुपारी १२.४५ ला पोचेल. अयोध्या येथे दर्शनासाठी श्रीरामभक्तांना दीड दिवसाचा कालावधी मिळणार आहे.
ही गाडी शयनयान डब्याची असून याचे आरक्षण लवकरच चालू होणार आहे. ही गाडी सांगली, सातारा, पुणे, कोपरगाव, भुसावळ, भोपाळ, झाशी, कानपूर, प्रयागराज अशा प्रमुख स्थानकांवर थांबणार असून विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आणि मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केले आहे.