कृतज्ञतेने जगणे व्हावे क्षणोक्षणी।

हे श्रीकृष्णा, ध्यास तुझा, भास तुझा।
रंग तुझा, गंध तुझा।
स्पर्श तुझा, हर्ष तुझा।। १।।

सौ. तेजा म्हार्दाेळकर

दृष्टी तुझी, सृष्टी तुझी।
सर्व चराचर तुझेच।
मग श्रीकृष्णा, मीही तुझीच ना।। २।।

गुरुदेवा, मग विलंब नको करूस।
घेण्या मज तव चरणांसी।
देवा, घेण्या मज तव चरणांसी।। ३।।

मग काय उणे या जीवनी।
कृतज्ञतेने जगणे व्हावे क्षणोक्षणी।
हीच प्रार्थना असते ध्यानीमनी।। ४।।

– सौ. तेजा म्हार्दाेळकर, म्हार्दाेळ, गोवा. (१.६.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक