पुणे – अयोध्येतील श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. पुण्यात ‘नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ या संस्थेमध्ये बाबरीच्या विषयावरून २३ जानेवारी या दिवशी हाणामारी झाली. ‘एफ्.टी.टी.आय. स्टुडंट असोसिएशन’ या संघटनेच्या वतीने बाबरीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हे आंदोलन उधळून लावत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यास चालू केले. या आंदोलनामागे साम्यवादी विचारांच्या संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.
फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरामध्ये ‘रिमेंबर बाबरी’, ‘डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. तसेच ‘फॉलन शॅल राईज’ (पाडलेले पुन्हा उभे राहील) अशा घोषणा दिल्या जात होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते ‘एफ्.टी.टी.आय.’च्या परिसरामध्ये घुसले. त्यांनी हे आंदोलन उधळून लावत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यास चालू केले. विद्यार्थ्यांनी लावलेले फलक फाडण्यात आले, तसेच काही फलक पेटवून देण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तसेच संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
‘एफ्.टी.टी.आय. स्टुडंट असोसिएशन’च्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करण्याची हिंदुत्वनिष्ठांची पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी स्वत:हून तत्परतेने कारवाई केली पाहिजे !
‘नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ येथे अशा प्रकारचे कृत्य करून सदर विद्यार्थ्यांनी थेट घटनेने स्थापित सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांविरोधात चिथावणी दिली आहे. अयोध्येतील श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सदर घटना कायद्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. त्यामुळे सदर प्रकरणात लिप्त असलेले ‘फिल्म इन्स्टिट्यूट’चे संचालक एस्.के. शहारे आणि तेथील ‘एफ्.टी.टी.आय. स्टुडंट असोसिएशन’च्या समाजकंटकांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. अधिवक्ता प्रदीप गावडे, सर्वश्री तुषार दामगुडे, अमोल शुक्ला, महेश पवळे, अजय कुटे आदींनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. श्रीराममंदिर निर्माणाचा इतिहास तपासला असता या विषयावरून दंगली, बाँबस्फोट होऊन आजवर शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अशा संवेदनशील विषयाला न्यायालयात मूठमाती मिळून त्या ठिकाणी भारतीय पंतप्रधानांनी श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी सरकारी सुटी घोषित करून उत्सव साजरा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
२. तरी फिल्म इन्स्टिट्यूट ही सरकारी संस्था असून तेथील विद्यार्थी जनतेच्या पैशांतून अनेक सुखसुविधा उपभोगतात. अर्थात् त्यामुळे त्यांनी त्यांचे मूलभूत हक्क बजावू नयेत असे कुठलाही सुजाण नागरिक म्हणणार नाही; परंतु तेथील विद्यार्थ्यांनी समाजात दंगल उसळण्यासाठी कारस्थान रचू नये, हेही अपेक्षित आहे.
Posters in support of Babri displayed at 'Film and Television Institute of India' in Pune !
👉To support Babri in this way, is #Pune in India or #Pakistan or any other I$l@mic country? Strictest action should be taken against those concerned!
👉 Devout Hindus submit… pic.twitter.com/QP3FzC56Iu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 24, 2024
संपादकीय भूमिका
|