श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अलीराजपूर (मध्यप्रदेश) येथे झाले विधी !
भोपाळ (मध्यप्रदेश) – याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत हिंदु धर्मात प्रवेश केला. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अलीराजपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी घरवापसी केली. याकूब खान यांनी धार्मिक विधी झाल्यानंतर म्हटले, ‘मी माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुका सुधारत आहे. मला आधीपासून सनातन हिंदु धर्माविषयी आस्था होतीच. मी स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारला आहे.’
याकूब खान यांना स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या साहाय्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करता आला. त्यांचे नाव ‘राजकुमार’ ठेवण्यात आले आहे. मुलगी करिश्माचे नाव पालटण्यात आले नाही, तर मुलगा शाहरूख आता ‘सुभाष’ या नावाने ओळखला जाईल.
याकूब उपाख्य राजकुमार यांची पत्नी मूळ हिंदूच असून तिचे नाव शारदा आहे. विवाहानंतरही त्यांनी हिंदु परंपरांचे पालन केले. त्यांनी त्यांच्या दोन विवाहित मुलीही हिंदु कुटुंबांतच दिल्या आहेत.