‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

  • रत्नागिरी जिल्ह्यातील १९६ श्रीराममंदिर आणि ४ सहस्र ६६३ ग्राममंदिर यांमध्ये श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

  • डीप क्लिनिंग (संपूर्ण स्वच्छता) २८ जानेवारीला चालू होणार !

उदय सामंत

रत्नागिरी – अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा जिल्ह्यातील १९६ श्रीराममंदिरांत आणि ४ सहस्र ६६३ ग्राममंदिरांत साजरा होत आहे. श्रीराममंदिर होणे, ही आपली अस्मिता होती. ते पूर्ण करणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जयेश मंगल पार्कमध्ये श्रीराममंदिर ट्रस्ट आणि नगर परिषदेच्या वतीने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री सामंत बोलत होते.


पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, शालेय जीवनापासून प्रति ५ वर्षांनी श्रीराममंदिराचा मुद्दा चर्चेत यायचा. जिल्ह्यातील २ सहस्र मंदिरांची स्वच्छता २ दिवसांत करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली ‘डीप क्लिनिंग’ ही स्वच्छता मोहीम रविवार, २८ जानेवारीपासून जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हावासियांनी सहभागी होऊन योगदान द्यावे.