Hindu Mandir In Pakistan : पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !

पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिर

नवी देहली – पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. श्री हिंगलाजमाता मंदिर हे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज येथील हिंगोल नदीच्या काठावर आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. येथे या देवीला श्री हिंगलाजदेवी किंवा श्री हिंगुलादेवी असेही म्हणतात.