पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रति आत्यंतिक भाव असलेल्या, सतत हसतमुख, अध्यात्मप्रसाराची तीव्र तळमळ असणार्या आणि शारीरिक आजार असूनही साधनारत असलेल्या सनातनच्या साधिका सौ. विद्या सुरेश जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आणि वय ६२ वर्षे) यांचे १६ जानेवारी या दिवशी सकाळी ७.४५ वाजता दीर्घकाळ रुग्णाईत असल्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्री. सुरेश जाखोटिया (आध्यात्मिक स्तर ६४ टक्के), १ मुलगा, १ सून, १ मुलगी, १ जावई, २ नातवंडे असा परिवार आहे. त्या मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक स्तर ६४ टक्के) यांच्या काकू, तसेच सनातन संस्थेच्या देवद, पनवेल आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. नटवरलाल जाखोटिया (आध्यात्मिक स्तर ६३ टक्के) यांच्या वहिनी होत. सनातन परिवार जाखोटिया कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.