(निळ्या रंगाचे कपडे परिधान करून शस्त्र बाळगणार्या योद्धा शिखांना निहंग शीख म्हणतात.)
कपूरथळा (पंजाब) – फगवाडा येथील गुरुद्वारा चौरा खुह साहिब अपवित्र झाल्याच्या संशयावरून लुधियानाच्या निहंग रमनदीप सिंग मंगू मठ याने एका तरुणाची तलवारीने वार करून हत्या केली. १६ जानेवारच्या पहाटे ३ वाजता ही घटना घडली.
हत्येची माहिती मिळताच पोलीस तेथे पोचल्यानंतर निहंग रमनदीप सिंग मंगू मठ याला अटक करण्यात आली. हत्येपूर्वी त्याने तरुणाचा व्हिडिओ बनवला. ज्यामध्ये हा तरुण गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी येथे आला असल्याचे आणि यासाठी त्याला २-३ सहस्र रुपये मिळणार असल्याचे सांगत होता. सुखी नावाच्या व्यक्तीने त्याला पाठवल्याचे तरुणाने सांगितले.