पुणे येथील उर्दू शाळेला विनाअनुमती केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस !

पुणे – भवानी पेठेतील हाजी गुलाम ‘महंमद आझम उर्दू प्रायमरी स्कूल’मध्ये विनाअनुमती बांधकाम केले असून ते त्वरित काढून टाकण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली होती; परंतु नोटिसीची समयमर्यादा संपल्यानंतरही केलेले अतिक्रमण हटवले नाही आणि त्याविषयी खुलासाही केला नाही; म्हणून पुढील १५ दिवसांमध्ये अतिक्रमण हटवले नाही, तर महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल आणि त्याचा व्ययही वसूल केला जाईल, अशा प्रकारची नोटीस कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांनी पुन्हा एकदा शाळा व्यवस्थापनाला दिली आहे.

संस्थेचे सचिव एस्.बी. इनामदार म्हणाले की, आम्ही कोणतेही अतिक्रमण केले नाही. येथे २ वेगवेगळ्या प्रकारच्या मिळकतीचा वाद असल्याने कागदपत्रे शोधण्यासाठी वेळ लागत असल्याने आम्ही बांधकाम विभागाकडे समयमर्यादा मागितली आहे. पडताळणीमध्ये जर विभागाला अतिक्रमण केल्याचे आढळून आले, तर आम्ही ते काढून टाकू.