मुंबई – शिवडी-न्हावाशेवा पूल चालू करा, अन्यथा आम्ही तो जनतेसाठी खुला करू, अशी चेतावणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राज्य सरकारला दिली आहे. गिरगावमध्ये आयोजित एका सभेत ते बोलत होते. ‘उद्घाटनासाठी वेळ नाही, तसेच देहलीकडून दिनांक मिळत नाही, अशी सरकारची स्थिती आहे. तुम्हाला देहलीला उत्तर द्यायचे आहे; परंतु मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे आहे’, असे ते या वेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गुजरातला जाणार्या बुलेट ट्रेनसाठी विनामूल्य भूमी देण्यात आली आहे; मात्र मुंबई – नवी मुंबई प्रवासासाठी आम्हाला २५० रुपये मोजावे लागणार आहेत. वर्ष २०२४ मध्ये आपले सरकार येताच घोटाळेबाजांना कारागृहात टाकणार आहे.