कु. अद्वैत पोत्रेकर याला नामजप करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. नामजप करतांना जाणवलेले त्रास
अ. ‘माझ्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत असून अनिष्ट शक्ती मला नामजप करू देत नाहीत’, असे मला जाणवत होते.
आ. माझ्या डोळ्यांसमोर चित्र-विचित्र आकृत्या येत होत्या, तसेच मला शाळेतल्या मित्रांचे किंवा कुणीतरी ओरडत असल्यासारखे विचित्र आवाज ऐकू येत होते.
इ. माझ्या अंगाला पुष्कळ खाज येऊन ‘अंगावर फोड आले आहेत’, असे मला वाटत होते.
ई. माझ्या अंगावर माशी येऊन बसल्यामुळे मला गुदगुल्या होत होत्या.
नंतर मी हे त्रास न्यून होण्यासाठी प्रार्थना केल्या.
२. नामजप करतांना आलेल्या चांगल्या अनुभूती
२ अ. एकाग्रता अनुभवणे : २.८.२०२३ या दिवशी मी नामजप करायला बसलो होतो. मी नामजप करण्यासाठी डोळे बंद केल्यावर एका मिनिटातच माझे मन एकाग्र होऊन निर्विचार झाले.
२ आ. एका संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजप करतांना भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू येऊन ते डोळ्यांच्या बाहेर न येणे : एकदा मला एका संतांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी एक सूत्र सांगितले, ‘भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू येऊनही ते डोळ्यांच्या बाहेर न येणे’, ही पुढील टप्प्याची भावजागृती असते.’ एकदा नामजप करतांना मला तशी अनुभूती आली. मी ३० मिनिटे नामजप केल्यावर माझे डोळे भावाश्रूंनी भरून आले; पण ते अश्रू डोळ्यांच्या बाहेर आले नाहीत.
२ इ. मला काही दिवसांपासून होत असलेला सर्दीचा त्रास नाहीसा झाला.
३. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून २ घंटे नामजप करून घेऊन माझे नामजपादी उपाय पूर्ण करून घेतलेत’, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. अद्वैत पोत्रेकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय १० वर्षे), फोंडा, गोवा. (२.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |