Ayodhya Liquor Ban : अयोध्येतील ८४ कोस परिक्रमा मार्गावर मद्यबंदी !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने अयोध्येतील ८४ कोस परिक्रमा  मार्गावर मद्यबंदी केली आहे. राज्याचे अबकारी मंत्री नितीन अग्रवाल यांनी ही घोषणा केली. या मार्गावर असणार्‍या दारूच्या सर्व ५०० हून अधिक दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.

काय आहे ८४ कोस परिक्रमा ?

अयोध्येचा राजा राम याचे साम्राज्य ८४ कोस (२५२ किलोमीटर) पसरले होते. यासाठी ८४ कोस परिक्रमेची परंपरा अनेक दशकांपासून आहे. या परिक्रमेच्या मार्गात उत्तरप्रदेशातील ६ जिल्हे येतात. सामान्य लोक मूल जन्माला यावे, यासाठी ही परिक्रमा करतात, तर संत आणि साधक मोक्षासाठी परिक्रमा करतात. असे मानले जाते की, ८४ कोस परिक्रमा केल्याने मनुष्य ८४ लाख जन्मांपासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो.