|
मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाने १.०४ कोटी किमतीचे २.६०० किलो काश्मिरी चरस कह्यात घेतले आहे. यात २२ लाख रुपये रोख आणि एका दुचाकीसह १२० ग्रॅम एम्.डी. (मेफेड्रोन) कह्यात घेतले आहे. अशा प्रकारे एकूण १.५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. या वेळी एका काश्मिरी व्यक्तीसह ६ अमली पदार्थ विक्रेते यांना पकडण्यात आले आहे. हाजी अब्दुल रेहमान असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला व्यसनाधीन करणार्या टोळीला आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |