Triple Talaq : गेल्या ५ वर्षांत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक मुसलमान महिलांना मिळाला तिहेरी तलाक !

तिहेरी तलाकविरोधी कायद्याला ५ वर्षे पूर्ण होऊनही घटनांमध्ये घट नाही !

नवी देहली – केंद्र सरकारने मुसलमान महिलांसाठीचा ‘तिहेरी तलाक’ (तीन वेळा ‘तलक तलाक तलाक’ म्हणत घटस्फोट देणे) प्रकार कायद्याद्वारे रहित केला. याला आता ५ वर्षे पूर्ण झाली; मात्र तरीही तिहेरी तलाकच्या घटनांत घट झालेली नाही. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३ मध्येच आतापर्यंत १ लाख ५७ सहस्र ७२५ मुसलमान महिलांना तिहेरी तलाक देण्यात आला आहे. यातील बहुतांश महिला गरीब आहेत.

अ. १९ सप्टेंबर २०१८ या दिवशी कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक तिहेरी तलाकच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०१९ मध्ये २ लाख ६९ सहस्र, तर वर्ष २०२० मध्ये ९५ सहस्र, वर्ष २०२१ मध्ये ५ लाख ४१ सहस्र आणि वर्ष २०२२ मध्ये २ लाख ४५ सहस्र घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये या महिलांना विविध सरकारी प्राधिकरणांद्वारे कायदेशीर साहाय्य देण्यात आले.

आ. सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती बी.एस्. चौहान यांनी सांगितले की, या संदर्भात मुसलमानांच्या मोठ्या नेत्यांनी समाजामध्ये जागृती करणे आवश्यक आहे. या कायद्यातील कठोर कलमांची माहिती दिली पाहिजे. तसेच पीडित महिलेचे म्हणणे ऐकल्याविना पतीला अंतरिम जामिनावर सुनावणी करू नये. यामुळे लोकांमध्ये भय निर्माण होईल आणि ते कायद्याचे पालन करतील. न्यायालयांनीही अशा प्रकरणांकडे कठोरतेने पाहिले पाहिजे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या विरोधात कितीही कठोर कायदे बनवले, तरी ते त्यांच्या धर्मानुसारच वागतात आणि भारतीय कायद्यांचे सर्रास उल्लंघन करून गुन्हे करत रहातात. भविष्यात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदी कायदे केले, तरी मुसलमान त्याचे किती पालन करतील, याची शंकाच येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !