वॅगनर गटाचे प्रमुख प्रिगोझिन यांच्या हत्येचा पुतिन यांनी दिला होता आदेश ! – माजी गुप्तचर अधिकारी

रशियाच्या माजी गुप्तचर अधिकार्‍याची माहिती

डावीकडून व्लादिमिर पुतिन, निकोलाई पात्रुशेव्ह आणि येवगेनी प्रिगोझिन

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे उजवे हात मानले जाणारे देशाचे सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह यांच्या सांगण्यावरून वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचा आदेश पुतिन यांनी दिला होता. एका अमेरिकन वृत्तपत्राने रशियाच्या माजी गुप्तचर अधिकार्‍याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सौजन्य विऑन 

१. युक्रेन युद्धात वॅगनर गट हा रशियन सैन्याचा एक महत्त्वाचा भाग होता; पण नंतर वॅगनर गटाचे प्रमुख प्रिगोझिन आणि रशियाचे संरक्षणमंत्री यांच्यातील वाद वाढत गेला. यामुळे वॅगनर गटाने जून २०२३ मध्ये रशियामध्ये बंड करण्याचा प्रयत्न केला.

२. या बंडानंतर पात्रुशेव्ह यांनी प्रिगोझिन यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. वॅगनर गटाच्या वाढत्या सामर्थ्यामुळे पुतिन यांची चिंता वाढली होती.

३. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी नंतर प्रिगोझिन आणि त्यांचे भाडोत्री सैनिक यांना त्यांच्या देशात येण्याची अनुमती दिली आणि प्रिगोझिन अन् पुतिन यांच्यात मध्यस्थी केली होती.

४. प्रिगोझिन आणि वॅगनर गटाचे इतर कमांडर ऑगस्टमध्ये विमानस्फोटात ठार झाले होते.

पात्रुशेव यांनी पुतिन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रारंभीपासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांना रशियामधील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत शक्तीशाली व्यक्ती मानली जाते.