|
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मुढापांडे भागातील माता चामुंडा मंदिराच्या कुंपणाच्या भिंतीची उभारणी केली जात असतांना स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला. या वेळी ते उपस्थित हिंदूंशी वाद घालू लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांनी दगडफेकही केली. या वेळी मुसलमान महिलाही आक्रमण करत असल्याचे या घटनेचा सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या व्हिडिओत दिसून आले. १९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी ३४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून ५ जणांना अटक केली आहे. यांत अब्दुल्ला आणि रहीस यांचा समावेश असून त्यांनीच त्यांच्या साथीदारांना बोलावून हिंसाचार केला.
१. माता चामुंडा मंदिराच्या कुंपणाच्या भिंतींची दुरवस्था झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हिंदु भाविक त्याच्या उभारणीची मागणी करत होते.
२. गेल्या मासात २५ नोव्हेंबर या दिवशी याचे काम चालू केले असता मुसलमानांनी त्यास विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भिंतींच्या उभारणीचे काम थांबवले.
३. त्यानंतर पुन्हा १९ डिसेंबर या दिवशी भिंतींच्या उभारणीच्या कामाला आरंभ केला असता मुसलमानांनी हिंसाचार केला. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांची पथके उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
४. मुसलमानांकडून जैबुन्निशा नावाच्या महिला अधिवक्त्याने सांगितले की, हे मंदिर पहिल्यापासून असले, तरी हिंदू या मंदिराचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिका
|