वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे वर्ष २०२४ मध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ते लढवू शकणार नाहीत. ६ जानेवारी २०२१ या दिवशी ‘यूएस् कॅपिटल’ (अमेरिकेची संसद) येथे झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांना उत्तरदायी ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार्याला घटनेच्या १४ व्या दुरुस्तीच्या कलम ३ चा वापर करून अपात्र ठरवण्यात आले आहे. वर्ष २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. यानंतर ६ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून हिंसाचार घडवून आणला होता.