योगीबाबांनी माझे रक्षण करावे, मी कधीही गोतस्करी करणार नाही ! – गोतस्कर महंमद आलम

  • बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी

  • पोलिसांसमोर पत्कारली शरणागती !

गोतस्कर महंमद आलम

बदायूं (उत्तरप्रदेश) – गोतस्करी आणि अन्य अनेक गुन्ह्यांत फरार असलेला महंमद आलम याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या वेळी त्याने गळ्यात एक पाटी घातली होती. त्यावर लिहिले होते, ‘‘मी महंमद आलम पुत्र नूर महंमद, निवासी खैरपूर खैराती ठाणे, सहसवान, बदायूं ! मी पोलिसांकडे स्वत:ला स्वाधीन करत आहे. आता यापुढे कधी गोतस्करी करणार नाही. योगी बाबांनी माझे रक्षण करावे.’’ गळ्यात पाटी घातल्याचे त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.

पोलीस महंमद आलम याचा शोध घेत होते. त्याच्या टोळीत एकूण ५ लोक असून अन्य चौघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. आलम याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावरही धाडी घातल्या होत्या. त्यामुळे धास्तावलेल्या आलम याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.