|
रोम (इटली) – इस्लामी संस्कृती आणि युरोपीय संस्कृती यांमध्ये काहीही साम्य नाही. युरोपाचे इस्लामीकरण चालू आहे. युरोपात इस्लामला काही जागा नाही, असे परखड वक्तव्य इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्या त्या पुढे म्हणाल्या की, इटलीमधील इस्लामी सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरेबियाकडून अर्थसाहाय्य मिळत आहे. तिथे शरीयत कायदा लागू आहे. आमच्या सभ्यतेचे मूल्य आणि इस्लामी मूल्य यांमध्ये साधर्म्य नाही. या दोन्ही संस्कृती परस्परविरोधी आहेत. त्यामुळे मुसलमानांनी युरोपापासून दूर रहावे.
Ahead of New Year, Big News coming from Europe. Powerful & influential leaders attended the fest. pic.twitter.com/JkwulpGpEm
— Times Algebra (@TimesAlgebraIND) December 17, 2023
जॉर्जिया मेलोनी यांच्या या विधानाच व्हिडिओ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर प्रसारित झाला आहे. युरोपमध्ये येत असलेल्या मुसलमान शरणार्थींपासून युरोपीय संस्कृतीला धोका असल्याचे सुनक यांनी म्हटले होते. पंतप्रधान सुनक हे अलीकडेच इटली दौर्यावर आले होते. त्यावेळी युरोपमध्ये अवैधरित्या वाढणार्या शरणार्थी संख्येवर त्यांनी भाष्य केले. शरणार्थींकडून युरोपमध्ये वाढणार्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.
जॉर्जिया मेलोनी यांचा परिचय !
सप्टेंबर २०२३ मध्ये देहलीत झालेल्या जी-२० परिषदेत सहभागी झालेल्या जॉर्जिया मेलोनी भारतियांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्या प्रखर राष्ट्रनिष्ठ राजकीय पक्ष ‘ब्रदर्स ऑफ इटली’च्या नेत्या असून स्वत:ला द्वितीय विश्वयुद्धात सहभागी असलेले इटलीचे हुकूमशहा मुसोलिनी याचे वारस असल्याचे म्हणतात.
संपादकीय भूमिकाभारताचे गेल्या १ सहस्र वर्षांपासून इस्लामीकरण होत असून मुसलमान आक्रमकांमुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भूभाग त्यांनी गिळंकृत केले. एवढे होऊनही आमचे राजकीय नेते लांगूलचालनाचे राजकारण करून आत्मघात करत आहेत. एवढे होऊनही हिंदू जागृत होत नाहीत, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! |