भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे नेते आणि तेलंगाणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) नेमल्याने भाजपच्या ८ आमदारांनी शपथ घेतली नव्हती. शेवटी ओवैसी यांना पदावरून हटवून वरिष्ठ काँग्रेस नेते गद्दाम प्रसाद कुमार यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतरच भाजपचे आमदार शपथविधीसाठी गेले. अकबरुद्दीन ओवैसी यांना जोपर्यंत हटवत नाही, तोपर्यंत शपथ घेणार नसल्याची भूमिका भाजपच्या आमदारांनी घेतली होती.
तेलंगाणाचे तिसरे विधानसभा अध्यक्ष म्हणून कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर आमदार टी. राजासिंह, येलेटी महेश्वर रेड्डी, वेंकटरमण रेड्डी, पायल शंकर, पैडी राकेश रेड्डी, रामाराव पटेल पवार, धनपाल सूर्यनारायण आणि पलवई हरिश बाबू या ८ आमदारांना अध्यक्षांनी पद अन् गोपनीयता यांची शपथ दिली. तेलंगाणा विधानसभेचे गद्दाम प्रसाद कुमार हे पहिले दलित अध्यक्ष आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंना संपवू पहाण्याची भाषा करणार्या अशांना ही चपराकच होय. अर्थात् असा अध्यक्षपदावरून हटवण्यासारखा अवमान झाल्यावर एखाद्या स्वाभिमानी आमदाराने आमदारकीचे त्यागपत्र दिले असते, हेही तितकेच खरे ! |