|
दिग्रस (यवतमाळ) – भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणार्या, तसेच केंद्रशासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था भारतात राबवली जात आहे. या अवैध हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांसमुक्त करावी, अशा मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने दिग्रस येथील नायब तहसीलदार सौ. स्नेहल देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपचे श्री. रवी अरगडे, श्री. प्रमोद बनगीनवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. संकेत दातीर, ‘शिवतेज’ संघटनेचे श्री. पांडुरंग दारोळकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शुभम गावंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशील जोशी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.