Allahabad University Blast : अलाहाबाद विश्‍वविद्यालयाच्या वसतीगृहात बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात २ विद्यार्थी घायाळ

घायाळ विद्यार्थी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील अलाहाबाद विश्‍वविद्यालयाच्या वसतीगृहाच्या एका खोलीमध्ये बनवण्यात येणार्‍या बाँबचा स्फोट होऊन २ विद्यार्थी घायाळ झाले. यांतील एकाचे नाव प्रभात यादव असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. प्रभात बाँब का बनवत होता ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रभात यादव एम्.ए.चे शिक्षण घेत आहे.