पुणे – राज्याच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सिंहगडावरील कल्याण दरवाजा आणि बुरुज गडप्रेमींना वर्षभरात मूळ रूपात बघण्याची संधी मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी कल्याण दरवाजाचा मोठा भाग ढासळल्याने बुरुज आणि परिसर धोकादायक झाला होता. गडाच्या भिंतीला तडे गेले होते. बुरुजाचे दगड गडाच्या बाहेर उतारावरील बाजूला पडले होते. तसेच त्यातील पायर्याही गायब झाल्या होत्या; मात्र पुरातत्व विभागाने बुरुजाची पहाणी करून कल्याण दरवाज्याची दुरुस्ती आणि बुरुजाच्या ढासळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. ‘बांधकाम करतांना मोठे दगड वर वाहून नेणे आणि प्रत्यक्ष काम करणे, कठीण गोष्ट आहे. बांधकामासाठी केवळ दोन फूट जागा शिल्लक आहे; मात्र वर्षभरात आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत’, असे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाला विलंबाने का होईना सुचलेले शहाणपण म्हणायचे का ? |