माणसातील देव पाहिला आणि पूजला, तरी पुरोगाम्यांना तो नकोच असतो !

वेदमूर्ती भूषण जोशी

‘पुरोगामी म्हणतात, ‘‘आम्ही माणसात देव पहातो. देव दगडात नसतो, तर तो माणसात असतो.’’ अशी पल्लेदार पुरोगामी वाक्ये ऐकायला बरी वाटतात; पण साम्यवादी पुरोगामी खरेच असे वागतात का ? त्यांच्या सांगण्यात आणि कृतीत फार तफावत असते.

आस्तिक श्रद्धावान मंडळी एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचे आचरण आणि त्यांचे थोर चरित्र आदर्शवत् मानून त्यांचे पूजन करतात, तेव्हा हेच पुरोगामी थयथयाट करून ‘यांना देवत्व बहाल करू नका’, असा कंठशोष करतात. उदाहरणार्थ छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे एखाद्या कार्यक्रमात अथवा घरामध्ये पूजन करणार्‍यांना हे पुरोगामी पहातात, तेव्हा लगेच वैचारिक ओकारी करतात, ‘‘ही माणसे आहेत. यांना देव बनवू नका.’’ पण आधी कंठशोष करून ‘आम्ही दगडात देव पहात नाही. माणसात पहातो’, हे यांचेच सांगणे ते विसरलेले असतात. ‘मंदिरातील देवाची पूजा नको’, असे म्हणत माणसातील देव पाहिला आिण पूजला, तरी नकोच असतो.

हिंदु धर्मात माणसांत देव पहातात; म्हणूनच कुमारिका आणि सवाष्ण यांचे पूजन करतात. अगदी विधवा माता-भगिनींना ‘गंगा भागीरथी (गं.भा)’, संबोधले जाते. त्यांना तीर्थवत् मानतात. स्वतःचा पाय चुकून दुसर्‍याला लागला, तरी नमस्कार करतात; कारण त्याच्यात त्यांना देवच दिसतो. असे केले, तरी पुरोगामी रागवतात. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी पुरोगाम्यांना वैचारिक चुकांचे योग्य दृष्टीकोन देऊन बुरखे फाडायचे आहेत. त्यामुळे वरील प्रकारचे चुकीचे विचार कुणी सांगितले की, त्यांना उत्तर द्या !

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२.१२.२०२३)