सायबर क्राईम पोलीस असल्याचे सांगून महिलेची फसवणूक !

गुन्हेगारांना पोलिसांचे भय नाही, हे दर्शवणारी घटना !

पनवेल – सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करून खारघर येथील एका महिलेची १ लाख ४७ सहस्र रुपयांना एकाने फसवले. खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘इंटरनॅशनल पार्सल’ आले असून ‘एक क्रमांक दाबा’ असे त्या महिलेला भ्रमणभाषवर सांगण्यात आले.

फिलेक्स नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला इंटरनॅशनल पार्सलमध्ये अवैधरित्या पासपोर्ट, कागदपत्र, अमली पदार्थ आणि कपडे असल्याने हा फोन मुंबईच्या सायबर क्राईम पोलीस विभागात जोडून देत असल्याचे सांगितले. सायबर क्राईमच्या कथित अधिकार्‍याने संबंधित महिलेला तिच्या आधारकार्डचा चुकीच्या ठिकाणी वापर केल्याचे सांगून भिती दाखवली. त्यानंतर एकाने अधिकारी असल्याचे सांगून तिच्या बँक खात्याचा तपशील मागवून घेतला. त्यानंतर महिलेला १५ मिनिटांत तुमची रक्कम तुमच्या अधिकोषाच्या खात्यात पुन्हा जमा होईल, असे सांगून एका खात्यावर ही रक्कम पाठवायला सांगितली. खरे पोलीस सांगत असल्याचे वाटून त्या महिलेने ती रक्कम पाठवली.

संपादकीय भूमिका

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची वाढती उदाहरणे पहाता सर्व नागरिकांनीच सतर्क रहाणे आवश्यक !