हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

कोटी कोटी प्रणाम !

आज महर्षि अरविंद यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…

महर्षि अरविंद

‘मला याचे दुःख आहे की, हिंदु-मुसलमान एकता अंधश्रद्धेच्या आधारे बनवण्यात येत आहे. सत्याची उपेक्षा करून काहीही हशील होणार नाही. एक दिवस हिंदूंना मुसलमानांविरुद्ध लढावे लागेल. त्यासाठी त्यांना सिद्ध व्हावे लागेल. मुसलमानांशी एकता म्हणजे हिंदूंची पराधीनता ! प्रत्येक वेळी हिंदूंना आपल्या सहिष्णुतेमुळे पराजित व्हावे लागले. सर्वांत उत्तम गोष्ट, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे. ज्यामुळे हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर आपोआप मिळेल. नाही तर आत्मसंतुष्टीच्या भ्रमित जाळ्यात अडकून पडू की, आम्ही कठीण समस्येवर उत्तर शोधले. वास्तवात आम्ही त्या समस्येपासून पलायन केलेले असेल. (१८.४.१९२३)

‘मी तुम्हाला सहन करू शकत नाही’, असे म्हणणार्‍या लोकांबरोबर तुम्ही एकत्र शांततेने कसे राहू शकाल ? मुसलमान सातत्याने हिंदूंचे धर्मांतर करणार आणि अशांशी हिंदूंनी एकता स्थापित करायची. हे कसे शक्य आहे ? अशा प्रकारे हिंदु-मुसलमान एकता स्थापित होणे शक्य नाही.’ (२३.७.१९२३)
(संदर्भ : ‘वार्तालाप इव्हनिंग टॉक्स विथ श्री अरविंदो’ यातील संकलन १९९५, पृष्ठ २८९ आणि २९१)

(महर्षि अरविंद यांचे वर्ष १९२३ मधील हिंदु-मुसलमान समस्येवरील उद्गार आजही तंतोतंत लागू पडतात, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ या कथित घोषणेला न भुलता हिंदूंनी स्वतःचे प्रभावी संघटन करणेच महत्त्वाचे ! – संपादक)

(साभार : साप्ताहिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’)