गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या महंमद जुनैदसह इतर गुंडांशी पोलिसांची ३ डिसेंबरच्या रात्री चकमक उडाली. यात महंमदच्या पायाला गोळी लागून तो घायाळ झाला. जुनैदचे अन्य चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
३० नोव्हेंबर या दिवशी गाझियाबादच्या टॉनिका सिटी परिसरात एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी आरोपींचा शोध चालू केला. ३ डिसेंबर या दिवशी खानपुरा येथील जंगलात संशयित लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तेथे पोचताच संशयितांनी पोलिसांवर गोळीबार चालू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या वेळी उडालेल्या चकमकीत महंमद जुनैदच्या पायाला गोळी लागून तो घायाळ झाला. अन्वेषणाच्या वेळी महंमदने सामूहिक बलात्काराच्या कृत्यात त्याचा सहभाग असल्याची स्वीकृती दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त लोनी यांनी दिली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |