कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त सरकारकडे मागणी
कोल्हापूर – राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’च्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली. हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘हिंदु युवा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. अशोक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, ‘भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती’चे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी केले.
विशेष – शिपेकरवाडी येथील धर्मप्रेमी श्री. विकास भाटे हे १५ किलोमीटर अंतरावरून आंदोलनासाठी आले होते.
उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. संजय कुलकर्णी, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, भाजप युवामोर्चाचे श्री. अमेय भालकर, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. नितीन चव्हाण, धर्मप्रेमी श्री. कृष्णात दिंडे, श्री. संदीप चौगुले, बजरंग दलाचे श्री. प्रथमेश मोरे, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. अमर जाधव, श्री. वैभव कवडे व अन्य.