१. राष्ट्रभक्त निर्मितीचे कार्य लवकर यशस्वी होण्यासाठी देशाच्या प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षणाचे कार्य होणे आवश्यक !
मी अनेक वर्षांपासून गायत्री परिवाराच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करत आहे. राऊरकेला (ओडिशा) येथे माझी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून मला एक नवीन दिशा मिळाली आणि हिंदु धर्माची स्थिती समजली. मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंची सर्व क्षेत्रे कह्यात घेऊ पहात आहेत, तर हिंदू हळूहळू लहान लहान गोष्टींमध्ये जखडले जात आहेत. (मुसलमान आणि ख्रिस्ती) एवढे नियोजनबद्ध कार्य करत आहेत की, ‘आपण गायत्री यज्ञ कुठे करायचा ?’, असा प्रश्न पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे कालांतराने हिंदूंचे सर्व कार्य हळूहळू बंद पडू लागले आहे. ही परिस्थिती माझ्या लक्षात आल्यानंतर दृढ संकल्प केला की, आपले उरलेले आयुष्य संपूर्णपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी व्यतित करायचे. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गावोगावी फिरून हनुमान मंदिरांची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी युवकांचे संघटन केले आणि बलसंपन्न सेना सिद्ध करून ठेवली. त्यामुळे भारतातील प्रत्येक गावात एक तरी मंदिर आहे. या प्रत्येक मंदिरात धर्मशिक्षणाचे कार्य चालू केले, तर राष्ट्रभक्तांच्या निर्मितीचे कार्य लवकरच यशस्वी होईल.
२. अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंना संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक !
वर्ष १९४७ पासून धर्मांध आणि ख्रिस्ती यांचे कार्य पद्धतशीरपणे चालू आहे. आता ते संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोचले आहे. ते केव्हा आपल्या घरात शिरतील, हे सांगता येत नाही. एकदा का ते आपल्या घरात शिरले, तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे या भयंकर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सिद्ध रहायला पाहिजे. मंदिरांच्या माध्यमातून आपल्याला ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. एका अंतर्गत व्यवस्थेने सर्वांना जोडून ठेवावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आपण एखाद्या मुसलमानाला साधी थापड मारली, तरी त्याचे वृत्त जुम्मा मशिदीमध्ये जाऊन पोचते. जुम्मा मशिदीच्या जवळपासच्या भागात सर्व धर्मांधांना निरोप मिळताच पुढील १० मिनिटांच्या आत ५ सहस्र लोक तेथे एकत्र येतात. याउलट आपल्या हिंदु बांधवांपैकी एखाद्याला कुणी रस्त्यात मारहाण करत असेल, तर हिंदू बाजूला उभे राहून त्या प्रसंगाचे छायाचित्रण करतील आणि सामाजिक माध्यमांवर प्रसारित करतील; परंतु त्या हिंदु बांधवाला साहाय्यासाठी पुढे कुणी येणार नाहीत. त्यामुळे अशा सर्व हिंदूंना जागरूक करण्यासाठी गावागांवातून संघटन उभे केले पाहिजे, तरच आपण यात यशस्वी होऊ शकतो.
आपल्याला संपर्क व्यवस्थेचे जाळे बनवावे लागेल. हिंदूंचे शत्रू फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ एकजुटीने कार्य करत राहिले, तर हिंदु राष्ट्राच्या या कार्यात निश्चितपणे यशस्वी होऊ. आपण एकटे फार कमकुवत आहोत. आपण सर्वजण एकजुटीने राहिलो, तर आपल्याला कुणीही तोडू शकणार नाही आणि त्रासही देऊ शकणार नाही.’
– श्री. नित्यानंद दास, उपविभागीय समन्वयक, गायत्री परिवार, सुंदरगड, ओडिशा.
श्री. नित्यानंद दास यांचा परिचयश्री. नित्यानंद दास हे गायत्री परिवाराच्या मार्गदर्शनानुसार ओडिशा येथे सेवारत आणि साधनारत आहेत. श्री. नित्यानंद दास यांचा हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी भाव‘मी ओडिशा (उत्कल) प्रांतातून, म्हणजे जगन्नाथपुरी धाम येथून आलो आहे. सध्या जगन्नाथपुरीला जगन्नाथाची रथयात्रा चालू आहे. ‘जेव्हा आम्ही हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या स्थळी पोचलो, तेव्हा सर्वांच्या मुखावरील हर्ष आणि संतोष पाहून आपण जणू सुधर्मा सभेत पोचलो आहोत’, असा दिव्य भाव आमच्या मनाला उत्तेजित करत होता आणि संपूर्ण वेळ त्याच भावात लीन आहे.’ |