‘वर्ष २०२२ मध्ये माझा श्री. दुर्गेश परुळकर यांच्याशी संपर्क झाला. मी त्यांना रामनाथी (गोवा) येथील ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन’ चालू असतांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी राष्ट्र आणि धर्म या विषयांवर विनामूल्य लेख देऊ शकता का ?’, या अन् अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटलो. त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितले, ‘‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विनामूल्य लेख देत जाईन, तसेच तुम्हाला कुठल्याही विषयाचे लिखाण हवे असेल, तर कळवत जा. मी ते आवर्जून लिहून देईन.’’ त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर आतापर्यंत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि आश्रमातील साधक यांची आपुलकीने विचारपूस करणे
माझे श्री. परुळकर यांच्याशी अनुमाने १० – १५ दिवसांनी एकदा तरी बोलणे होते. त्या वेळी भ्रमणभाष ठेवण्याआधी ते आवर्जून सगळे साधक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी प्रेमाने अन् श्रद्धापूर्वक विचारपूस करतात. तेव्हा ते विचारणा करतात, ‘‘तुम्ही सगळे बरे आहात ना ? काही हवे आहे का ? सगळ्यांचे प्रयत्न कसे चालू आहेत ?’’
२. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी अभ्यासपूर्ण लिखाण तत्परतेने देणे
श्री. परुळकर दैनिक ‘सनातन प्रभात’साठी स्वातंत्र्यवीर सावरकर; काँग्रेस आणि पुरोगामी यांच्याकडून होणारे खोटे आरोप, राष्ट्र अन् धर्म यांवर होणारे आघात, तसेच राष्ट्रपुरुष अन् संत यांच्याविषयीचे दैवी, तसेच शौर्ययुक्त अभ्यासपूर्ण लिखाण देतात. त्यांच्या लिखाणातून अनेकांना नवीन पैलू कळतात आणि विरोधी शक्तींना चपराक बसते. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’साठी कधीही कोणत्याही विषयावरचे लिखाण मागितले, तर ते आवर्जून आणि समयमर्यादेत अभ्यासपूर्ण लिखाण देतात.
३. श्री. परुळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाचे केलेले कौतुक !
जून २०२६ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले वेगवेगळे लेख वाचून त्यांनी मला कळवले, ‘‘सध्या दैनिकाच्या लिखाणाची गुणवत्ता चांगली वाढली असून ते बाजूलाठेवता येत नाही. लेख आणि वार्ता अप्रतिम असतात अन्त्यामुळे ज्ञानात भर पडते.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे परब्रह्म आहेत’, असा भाव असणे
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या आयोजनात चुका झाल्याने सद्गुरूंनी सर्वांसमक्ष क्षमायाचना केली. तेव्हा त्यांनी मला भ्रमणभाष करून कळवले होते, ‘‘एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर झाले. यात थोडे काही चुकले असले, तरी उच्च कोटीच्या संतांनी क्षमा मागायला नको. त्यांनी क्षमा मागणे, म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी क्षमा मागितल्यासारखे आहे. असे करणे योग्य नव्हे. ते परब्रह्म आहेत. महोत्सव ‘सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा’, असा झाला.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेली विचारपूस अन् पाठवलेला खाऊ यांमुळे भावजागृती होणे
श्री. परुळकर आजारी असल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कळले होते. त्या वेळी गुरुदेवांनी त्यांना काही साहाय्य लागल्यास कळवण्यासह खाऊ पाठवला होता. साधकांनी त्यांना घरी जाऊन खाऊ दिला आणि गुरुदेवांनी त्यांची विचारपूस केल्याचे कळवले. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू आले. ते इतके सद्गदित झाले होते की, त्यांनी मला भ्रमणभाष करून कळवले, ‘‘तो खाऊ घेतल्यानंतर पुढे एक घंटा मी आणि माझी पत्नी (सौ. मेधा परुळकर), आमच्या दोघांच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’’
– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२३.७.२०२६)
४. सनातन संस्थेच्या कार्याचा प्रसार करणे
४ अ. हिंदुत्वनिष्ठांना सनातन संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणे : श्री. परुळकर त्यांच्या संपर्कात येणारे नवनवीन हिंदुत्वनिष्ठ किंवा प्रतिष्ठित यांना सनातन संस्थेच्या कार्याची ओळख करून देतात. त्यांना कुणी अन्य संस्थेच्या कार्यक्रमात बोलावले असेल, तर ते सनातन संस्थेच्या साधकांना तेथे बोलावतात. त्यामागे ‘संबंधित नवीन लोकांची ओळख करून देणे आणि सनातन संस्थेच्या कार्याचा प्रसार होणे’, हा त्यांचा उद्देश असतो.
४ आ. इतर संस्थांना सनातन संस्थेच्या साधकांना वक्ता म्हणून बोलावण्याविषयी सांगणे : मध्यंतरी २ वेगवेगळ्या संस्थांनी धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी श्री. परुळकर यांना विचारणा केली होती, ‘‘आम्हाला कुणी वक्ता मिळू शकतो का ?’’ त्या दोन्ही वेळी श्री. परुळकर यांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांना बोलवू शकता. मी तुम्हाला त्यांचा संपर्क करून देतो.’’
५. रुग्णाईत असतांना साधकाला साधनेविषयी विचारणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने बरे वाटल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे

मध्यंतरी श्री. परुळकर यांना पोटाचा एक गंभीर आजार झाला होता. त्या वेळी त्यांना काही सेवा करणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘साधना म्हणून मला काय प्रयत्न करता येतील ?’’ त्या वेळी मी त्यांना झालेल्या आजाराविषयी जाणून घेतले आणि त्यांना विचारले, ‘‘मी संतांना विचारून तुम्हाला नामजप सांगितला, तर तुम्हाला चालेल का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘जसे शारीरिक उपाय करायचे असतात, तसे आध्यात्मिक स्तरावरील उपायही करायला हवेत. देवाचे नाव घेतल्याने जर माझ्यात अंतःकरणासह शारीरिक स्तरापर्यंत पालट होणार असेल, तर ते मी आवर्जून घेईन. एरव्ही मी नामजप करत असतो; मात्र तुम्ही मला नामजप कळवा. मी तो श्रद्धेने करीन.’’ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून मी त्यांना नामजप कळवला. त्याप्रमाणे त्यांनी जप केला. ते त्या आजारातून लवकर बरे झाले. त्यांनी त्याविषयी कळवले, ‘‘औषधोपचार आणि तुम्ही सांगितलेला नामजप यांमुळे मी लवकर बरा झालो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी माझा शिरसाष्टांग प्रणिपात !’’
६. भाव
६ अ. सनातन संस्थेप्रतीचा भाव : वर्ष २०२४ मध्ये सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्त २ विशेषांक वेगवेगळ्या वेळी काढण्यात आले. त्या वेळी त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी अप्रतिम लेख लिहून दिला होता. तो लेख वाचून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक म्हणून एक चौकट लिहिली होती.
६ आ. रामनाथी येथील सनातन आश्रमाप्रतीचा भाव : श्री. परुळकर बेळगाव किंवा अन्यत्र कुठे जात असतांना काही घंट्यांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतात. ते आश्रमात १ – २ घंटे थांबून सगळ्यांना भेटून चर्चा करतात, प्रसाद ग्रहण करतात आणि परत पुढच्या प्रवासाला निघतात. ते म्हणतात, ‘‘हा आश्रम आम्हाला भगवंताचे चैतन्य आणि शक्ती प्रदान करणारा आहे. मला या आश्रमातून पुढील वर्षभरासाठी हिंदु राष्ट्र आणि हिंदुत्व यांविषयीचे कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती अन् ऊर्जा मिळते; कारण या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे.’’
७. श्री. दुर्गेश परुळकर यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होत असल्याचे जाणवणे
वर्ष २०२२ मध्ये श्री. परुळकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. ‘त्यांची राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती असलेली ओढ, तसेच ते करत असलेली साधना, धर्मप्रसार करण्याची तळमळ, गुरुदेवांवरील श्रद्धा, त्यांनी लिहिलेला ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ, तसेच ते लिहित असलेला ‘द्रोणाचार्यां’विषयीचा ग्रंथ, ‘मदनलाल धिंग्रा’ यांच्याविषयीचे पुस्तक’, हे सगळे बघता ‘त्यांची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे मला वाटले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्री. दुर्गेश परुळकर यांच्यासारखे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले लेखक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांशी जोडले गेले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. श्री. दुर्गेश परुळकर यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार !’
– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२३.७.२०२६)
परदेशी वृत्तमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे सामर्थ्य !
गर्भाशय शुद्धीकरण (Uterine Detox) आणि आयुर्वेद
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
कारगिल : एक संहारक यशोगाथा !
…आता पंजाब आणि कर्नाटक येथील शिक्षणमंत्र्यांच्याही त्यागपत्राची मागणी करतील (?)
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !