राज्यशासनाचा निर्णय !
मुंबई – राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यास राज्यशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मुंबई मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह या चार कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे अन् पडताळणी यंत्रे (बॉडी स्कॅनर) बसवण्यात येणार आहेत. ही यंत्रे खरेदी करण्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
कारागृहांतील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या खरेदीसाठी १४ कोटी ४४ लाख ७१ सहस्र २७६ आणि बॉडी स्कॅनरसाठी ९ कोटी १२ लाख अशा एकूण २३ कोटी ५६ लाख ७१ सहस्र २७६ रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच खरेदीची प्रक्रिया चालू होईल.