परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या प्रगतीविषयीचे विश्‍लेषण

१. संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ (भारतात वस्‍तूंचे उत्‍पादन करणे) आणि ‘आत्‍मनिर्भर भारत’ यांना मोठे यश मिळत आहे. भारतीय बनावटीच्‍या ‘तेजस’ लढाऊ विमानाने चीनच्‍या ‘जे.एफ्.-१७’, दक्षिण कोरियाच्‍या ‘याक-१७’ या लढाऊ विमानांना मागे टाकत मलेशियाकडून खरेदीचे कंत्राट मिळवले. आता फिलिपाइन्‍स, अर्जेंटिना आणि इजिप्‍त या देशांकडूनही हे विमान खरेदीचे संकेत मिळत आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

२. चीनचा विकासदर घसरत असून त्‍याचे राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍न (जीडीपी) ३ टक्‍क्‍यांहून न्‍यून आहे. अमेरिका आणि युरोप येथे एकीकडे विकासदर घटत आहे, तर दुसरीकडे महागाई प्रचंड वाढत आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्‍या परिणामांवर मात करत भारताने राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नाचा विकासदर ६ टक्‍के स्‍थिर ठेवला आहे.