‘हिंदु धर्माची निंदा करणारे लोक ‘हिंदु धर्मात ३३ कोटि देव आहेत’, अशी कुचेष्टा करतात. त्याविषयी केलेले विवेचन पुढे दिले आहे.
बहुतेक लोकांना ‘तेहतीस कोटि’चा अर्थ ‘तेहतीस करोड’, असाच वाटतो; पण येथे ‘कोटि’ या शब्दातील ‘टि’ची पहिली वेलांटी आहे. मुळात संस्कृतमधील ‘कोटि’ या शब्दाचा अर्थ ‘करोड’, असा नसून ‘प्रकार’, असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवतांना वेगवेगळा कार्यभार सोपवला आहे. त्यांच्यात ‘८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती’, असे ५ स्तर आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी ‘कोटि’ (कॅटेगरी) दिलेली आहे.
१. अष्टवसू
आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास
२. अकरा रुद्र
मनु, मयु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज
३. बारा आदित्य
अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जय, पूषन, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णु
४. १ इंद्र आणि १ प्रजापती
असे एकंदर ८ + ११ + १२ + १ + १ = ३३. ही माहिती सगळ्यांना कळायला हवी; जेणेकरून ‘३३ कोटि’चा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल.’
(साभार : विविध संकेतस्थळे)