इंदूरमध्ये ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील रहीम खान नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका विवाहित हिंदु महिलेला ब्लॅकमेल करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. रहिम खानने विवाहित महिलेवर पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणला आहे. रहीम खान तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही दबाव आणत होता, असे पीडित महिलेने सांगितले.
पीडित महिलेने सांगितले की, तिच्या लहान बहिणीच्या वाढदिवसाला तिच्या आईच्या ओळखीचा रहीम खान तिच्या घरी आला होता. घरात रहीमने तिचा भ्रमणभाष उचलला आणि त्यातील तिच्या आईचे छायाचित्र त्याने स्वत:च्या भ्रमणभाषवर पाठवले. त्यानंतर त्याने ते छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून त्यामध्ये अश्लील गोष्टी लिहिल्या. त्यानंतर तो पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. तो तिच्यावर पतीला सोडून त्याची पत्नी होण्यासाठी दबाव आणू लागला. इस्लाममध्ये चार लग्नांना अनुमती आहे, असे सांगून तो तिच्यावर तिच्या लहान बहिणीचे धर्मांतर करण्यासाठीही धमकावू लागला.
या प्रकरणी आरोपी रहीम खानला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशमध्ये भाजपचे शासन असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !