अमरावती – आतापर्यंत पाकीटबंद खाद्यपदार्थ अथवा मिठाई यांच्या पाकिटांवर मुदतबाह्य दिनांक (एक्सपायरी डेट) नमूद करणे बंधनकारक होते. शासनाने आता बाजारात उघडपणे विक्री होणार्या मिठाईवर मुदतबाह्य दिनांक (एक्सपायरी डेट) नमूद करणे बंधनकारक केले आहे; परंतु शहरातील बहुतेक मिठाई विक्रेत्यांनी शासनाच्या या नियमाचे पालन केलेले नाही, असे एका वृत्तपत्राने केलेल्या पहाणीत दिसून आले आहे.
‘सणासुदीच्या काळात खवा आणि मिठाई यांना मोठी मागणी असते. शिळी मिठाई खाल्ल्याने अनेकदा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी मिठाईऐवजी फळे आणि सुकामेवा यांना प्राधान्य द्यावे’, असे आहारतज्ञ डॉ. उज्ज्वला ढेवले यांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवणार्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या विक्रेत्यांच्या दुकानांवर बंदीच आणायला हवी ! तसे केल्याविना ते सुधारणार नाहीत ! |