जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२४’चे प्रकाशन !

सनातन पंचांगाचे प्रकाशन करतांना (उजवीकडे) जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक

सासवड (जिल्हा पुणे), १० नोव्हेंबर (वार्ता) – संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी विसावा, वडकी नाला, सासवड रोड येथे ६ आणि ७ नोव्हेंबर या दिवशी ‘समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी स्वामीजींच्या हस्ते मराठी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२४’चे पूजन आणि प्रकाशन करण्यात आले.

सनातन पंचांगाचे पूजन करतांना जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज

यावेळी महाराजांनी विश्‍वभरातील युद्ध परिस्थितीविषयी भाष्य केले. जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, ‘‘इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामध्ये संपूर्ण जग ओढले जात आहे. माझ्या सर्व प्रवचनांमधून मी भक्तांना नेहमी सावध करत असतो. आपण सर्वांनीच सतर्क रहाण्याची वेळ आहे.’’

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासमवेत त्यांनी पूर्वी अनुभवलेले विविध आनंददायी प्रसंग सांगितले. ‘महाराजांची कृपादृष्टी सनातन संस्थेवर आहे’, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. या प्रसंगी श्री संप्रदायाचे सर्वश्री महेश परब आणि चंद्रकांत नाईक उपस्थित होते.