हमासच्या आतंकवाद्यांचे पशूलाही लाजवेल असे कृत्य !

तेल अविव (इस्रायल) – ७ ऑक्टोबरला हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांचा अमानुषपणे नरसंहार केल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहेत. या आक्रमणात बचावलेल्या एका इस्रायली युवतीने तिच्यासमोर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचे कथन केले आहे. तिने म्हटले की, हमासच्या आतंकवाद्यांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर तिचे स्तन कापून त्यांच्यासमवेत ते खेळले.
१. या युवतीने पुढे सांगितले की, मी लपले होते. तेव्हा एकामागून एक आतंकवादी एका महिलेचा बलात्कार करत असल्याचे मी पाहिले. आतंकवाद्यांनी सैन्याचा गणवेश घातला होता.
२. या घटनेप्रमाणे अनेक इस्रायली महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना इस्रायली सैन्याने समोर आणल्या आहेत. अत्याचार करून ठार मारलेल्या अनेक महिलांच्या शरिरावर अत्याचार केल्याच्या खुणा असल्याचे इस्रायली सैन्याच्या निदर्शनास आले होते.
३. हमासच्या २ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या आक्रमणात १ सहस्र ४०० हून अधिक इस्रायली लोकांची हत्या केली होती. या वेळी आतंकवाद्यांनी या घटनांचे व्हिडिओही बनवले आहेत.
४. इस्रायली सैन्य आणि पोलीस तब्बल ५० सहस्र व्हिडिओजचे अन्वेषण करत असून आतंकवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसे अत्याचार करणार्या हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, इस्लामी राष्ट्रे आणि भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! |
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
Love Jihad Planned Conspiracy : ५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !