केरळमध्ये २ माओवादी अटकेत !

वायनाड (केरळ) – केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने २ माओवाद्यांना अटक केली आहे. येथील थलप्पुझा भागात माओवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती मिळाल्यावर केरळ पोलिसांच्या पथकाने त्यांना घेरले. या वेळी त्यांच्यात चकमक झाली. या वेळी ३ जण पळून गेले, तर चंद्रू आणि उन्निमया या दोघांना अटक करण्यात आली. पळून गेलेल्या माओवाद्यांना गोळ्या लागल्याचा पोलिसांना संयश आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.