गोवा : व्याघ्र क्षेत्राच्या संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

पणजी : म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याच्या संदर्भातील संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी गोवा सरकारने नागरी अर्ज केला आहे आणि याला विरोध करणारी याचिका गोवा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. व्याघ्र प्रकल्पाचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याने उच्च न्यायालयातील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर घ्यावी, अशी मागणी दोघा याचिकादारांनी केली होती.

महाधिवक्ता (ॲटर्नी जनरल) देविदास पांगम

व्याघ्र प्रकल्पाला अधिसूचित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी गोवा शासनाची याचिका १० नोव्हेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे. गोवा फाऊंडेशन आणि गोवा सरकार या दोघांनी दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी ठेवण्याची संयुक्त विनंती न्यायालयाला केली, अशी माहिती महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी दिली.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा