‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेच्या अहवालातील माहिती !

नवी देहली – आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्या देशांवर कारवाई करणार्या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ म्हणजेच ‘फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ (समाजाला पैसे देण्याचे आवाहन करून तो पैसा आतंकवाद वाढवण्यासाठी वापरणे) नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालाच्या पृष्ठ क्रमांक ३८ वर भारतीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारतातील एका कट्टरतावादी संघटनेने नियोजनबद्धरित्या जाळे विणून संपूर्ण देशातून पैसे एकत्रित केले. मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना दान देण्याचा आग्रह करून प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन पद्धतीने पैसे एकत्र करण्यात आले. यासाठी ३ सहस्र बँक खात्यांचा वापर करण्यात आला. लोकांना ‘क्यूआर् कोड’ आणि बँक खाती यांची माहिती देऊन पैसे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. यांद्वारे जमा झालेले पैसे शस्त्रास्त्रे खरेदी करणे आणि आतंकवादी निर्माण करणे, यांसाठी वापरण्यात येत आहेत.
या अहवालात संबंधित संघटनेचे नाव नमूद केलेले नसले, तरी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही संघटना म्हणजे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) असल्याचे म्हटले आहे. या जिहादी आतंकवादी संघटनेवर गेल्या वर्षी केंद्रशासनाने बंदी घातली आहे. या पैशांतून नियमित उत्पन्न मिळण्यासाठी भूमी खरेदी-विक्री, तसेच अन्य व्यवसायांमध्ये हा पैसा गुंतवण्यात आला. या प्रकरणी ८ कट्टरतावाद्यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासह त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये हस्तगत करण्यात आल्याचे ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी